IND vs AUS T20 WC 2024 Super 8 Live Score Update: भारतीय संघाला मिळाली सहावी विकेट, कुलदीपने वेडचा घेतला अप्रतिम झेल

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 205 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्मान निडर होत 92 धावांची सर्वाधिक स्फोटक खेळी खेळली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि स्टाइनिसला प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळाल्या.

Team India (Photo Credit - X)

IND vs AUS T20 WC 2024 Super 8: आज टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातला महत्वाचा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. तत्तपुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 205 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्मान निडर होत 92 धावांची सर्वाधिक स्फोटक खेळी खेळली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि स्टाइनिसला प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळाल्या. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 206 धावा करायच्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 153/6

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement