SL vs PAK, Asia Cup Final 2022: आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय चाहत्यांना प्रवेश मिळाला नाही, पोलिसांवर धक्काबुक्कीचा आरोप (Watch Video)

त्यांना परत पाठवण्यात आले.

Photo Credit - Twitter

आशिया चषकाच्या फायनलमध्ये (Asia Cup Final 2022) भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. असे असतानाही टीम इंडियाच्या अनेक चाहत्यांनी दुबई स्टेडियममध्ये जाऊन विजेतेपदाचा सामना पाहण्याचा निर्णय घेतला. चाहत्यांना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायचा होता, मात्र त्यांना गेटवरच थांबवण्यात आले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'भारत आर्मी' या प्रसिद्ध फॅन क्लबच्या सदस्याने दावा केला आहे की, त्याला आणि इतर दोन चाहत्यांना भारतीय जर्सी घालून स्टेडियममध्ये प्रवेश दिला गेला नाही. त्यांना परत पाठवण्यात आले. 'भारत आर्मी'ने ट्विटरवर लिहिले की, "आम्ही आणि इतर भारतीय क्रिकेट चाहते टीम इंडियाची जर्सी घालून मॅचला जाऊ शकत नाही हे अत्यंत धक्कादायक वर्तन होते."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)