Virat Kohli Birthday Special: भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडसह अनेक खेळाडूंनी स्टार फलंदाज विराट कोहलीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, सांगितली ही खास गोष्ट (Watch Video)
कोहलीच्या 35व्या वाढदिवसानिमित्त टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि शुभमन गिल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांसारख्या अनेक खेळाडूंनी स्टार फलंदाज विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या प्रवासाविषयी बरंच काही सांगितलं.
भारतीय आणि जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांपैकी एक असलेला विराट कोहली 5 नोव्हेंबर रोजी 35 वर्षांचा झाला. हा दिग्गज 2008 मध्ये पदार्पण केल्यापासून चाहत्यांचे सतत मनोरंजन करत आहे. कोहलीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. इतक्या वर्षात स्टार क्रिकेटपटू भारतीय फलंदाजीचा कणा बनले आहेत. मधे अनेक चढउतार आले पण फॉर्म कायमच अबाधित राहिला. त्याच्या 35व्या वाढदिवसानिमित्त टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि शुभमन गिल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांसारख्या अनेक खेळाडूंनी स्टार फलंदाज विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या प्रवासाविषयी बरंच काही सांगितलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli Birthday: कोलकात्यात चाहत्यांनी साजरा केला विराट कोहलीचा 35 वा वाढदिवस, केकही कापला, पाहा व्हिडिओ)