IND W vs AUS W 3rd ODI 2024 Toss Update: शेवटच्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी केले आमंत्रित

IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी कायम ठेवली आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना 5 विकेटने आणि दुसरा 122 धावांनी गमावला. हरमन ब्रिगेड बुधवारी क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करणार आहे.

IND W vs AUS W (Photo Credit - X)

AUS W vs IND W 3rd ODI 2024: ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळला जात आहे. दोन्ही संघ पर्थच्या मैदानावर आमनेसामने आहेत. ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी कायम ठेवली आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना 5 विकेटने आणि दुसरा 122 धावांनी गमावला. हरमन ब्रिगेड बुधवारी क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

भारत-ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

भारत: स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, सायमा ठाकोर, रेणुका ठाकूर सिंग, अरुंधती रेड्डी, तीतास साधू.

ऑस्ट्रेलिया: फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वोल, एलिस पेरी, बेथ मूनी (विकेटकीपर), ॲनाबेल सदरलँड, ऍशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), सोफी मोलिनक्स, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शूट.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now