IND vs ENG, 3rd ODI: भारताने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी सिराज संघात
बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा प्लेईंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघात कोणताही बदल झालेला नाही.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहितने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली आहे. भारतीय कर्णधार रोहितने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. जसप्रीत बुमराह अनफिट असल्यामुळे खेळत नाही. बुमराहच्या बाबतीत तो धोका पत्करू इच्छित नाही, असे कर्णधार म्हणाला. बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा प्लेईंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघात कोणताही बदल झालेला नाही.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)