IND vs AUS 1st ODI Live Update: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेंइग 11

दोन्ही संघांमधील वनडे मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही संघात सर्वात मोठा बदल कर्णधारांमध्ये झाला आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (IND vs AUS) आता वनडे मालिकेत भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांमधील वनडे मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही संघात सर्वात मोठा बदल कर्णधारांमध्ये झाला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या सामन्यात उपस्थित राहणार नाही, अशा परिस्थितीत संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे असेल. दरम्यान, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघाची प्लेंइग 11

भारत: शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now