India Beat Sri Lanka: भारताने सलग दुसरा टी-20 सामना जिंकला, श्रीलंकेचा सात गडी राखून केला पराभव; मालिकेवर केला कब्जा

तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

IND vs SL 2nd T20I: आज, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 गडी राखुन पराभव करत मालिकेवर कब्जा केला आहे. तत्तपुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकाने 20 षटकात नऊ गडी गमावून 161 धावा केल्या. श्रीलंकेकडून कुशल परेराने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. तर दुसरीकडे, भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. डीएलस नियमामुळे टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 8 षटकात 78 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने अवघ्या 6.3 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 30 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी सायंकाळी 7 वाजता होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement