India Win Asia Cup 2023: भारताने श्रीलंकेचा दहा विकेटने केला पराभव, आठव्यांदा आशिया चषकावर कोरले नाव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ 15.2 षटकांत केवळ 50 धावांवरच मर्यादित राहिला.

टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील आशिया कपचा अंतिम सामना (Asia Cup 2023 Final) आज कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा दहा गडी राखून पराभव करत आठव्यांदा आशिया कप विजेतेपदावर कब्जा केला. या सामन्यात श्रीलंकेचा एकही फलंदाज मोहम्मद सिराजच्या झंझावातापुढे टिकू शकला नाही आणि संपूर्ण संघ अवघ्या 50 धावांवर गारद झाला. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ 15.2 षटकांत केवळ 50 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाच्या वतीने मोहम्मद सिराजने प्राणघातक गोलंदाजी करत सहा गडी बाद केले. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक 17 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने एकही विकेट न गमावता अवघ्या 6.1 षटकांत हे लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 27 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)