India's Tour Of Bangladesh 2022: डिसेंबरमध्ये तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी भारत बांगलादेशला जाणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

एकदिवसीय सामने संपल्यानंतर, भारत बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) गुरुवारी भारताच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक (India's Tour Of Bangladesh 2022) जाहीर केले, ज्याची सुरुवात ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 4, 7 आणि 10 डिसेंबर दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांनी होईल. एकदिवसीय सामने संपल्यानंतर, भारत बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे, पहिली कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान चितगाव येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर आणि त्यानंतर दुसरा कसोटी सामना ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. हा दौरा संपल्यानंतर भारत 27 डिसेंबरला बांगलादेशहुन रवाना होईल.

भारताचा बांगलादेश दौरा

4 डिसेंबर: पहिला वनडे, ढाका

7 डिसेंबर: दुसरी वनडे, ढाका

10 डिसेंबर: तिसरी वनडे, ढाका

14-18 डिसेंबर: पहिली कसोटी, चितगाव

22-26 डिसेंबर: दुसरी कसोटी, ढाका

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement