India vs Sri Lanka: श्रीलंकेवर 3-0 ने विजय मिळवल्यानंतर रिंकू सिंगला मिळाला 'फिल्डर ऑफ द सीरीज'चा पुरस्कार, BCCI ने शेअर केला व्हिडिओ
भारताचे फील्डिंग कोच टी दिलीप यांनी 'फिल्डर ऑफ द सीरीज' पुरस्कारासाठी दावेदारांची घोषणा केली आणि रवी बिश्नोई, रिंकू सिंग आणि रायन पराग यांची नावे घेतली.
भारताचा स्टार फलंदाज रिंकू सिंगला टी-20 मालिकेत श्रीलंकेवर 3-0 अशा विजयानंतर 'फिल्डर ऑफ द सीरीज' पुरस्कार मिळाला. नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पहिल्या दौऱ्याची सुरुवात श्रीलंकेवर 3-० ने मालिका विजयाने झाली. मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने यजमान संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. दरम्यान, बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. फील्डिंग कोच टी. दिलीप भाषण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान भारताचे फील्डिंग कोच टी दिलीप यांनी 'फिल्डर ऑफ द सीरीज' पुरस्कारासाठी दावेदारांची घोषणा केली आणि रवी बिश्नोई, रिंकू सिंग आणि रायन पराग यांची नावे घेतली. मात्र, सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेटे यांनी रिंकू सिंगला 'फिल्डर ऑफ द सिरीज' पदक दिले. तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता.
पाहा व्हिडिओ -
𝗗𝗿𝗲𝘀𝘀𝗶𝗻𝗴 𝗥𝗼𝗼𝗺 𝗕𝗧𝗦 | 𝗙𝗶𝗲𝗹𝗱𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗦𝗲𝗿𝗶𝗲𝘀 🏅
T20I series win ✅
Any guesses on winner of the fielding medal? 🤔
Find out 🎥🔽 #TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/1gzqQcpmuU
— BCCI (@BCCI) July 31, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2024 01:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

