India vs New Zealand, 3rd Test Day 2 Live Score Update: न्यूझीलंड संघाला आठवा धक्का, ईश सोढी 8 धावा करून बाद

पहिल्याच षटकांत कर्णधार टॉम लॅथम बाद झाला. यानंतर डेव्हन कॉनवे आणि विल यंगने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंरतू कॉनवे सुंदरने 22 धावांवर बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेल्या रचिन रविंद्रला अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

India vs New Zealand, 3rd Test Day 2 Live Score Update: न्यूझीलंड संघाला आठवा धक्का, ईश सोढी 8 धावा करून बाद
Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Match Scorecard:   भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series)  शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर  (Wankhede Stadium)  खेळला जात आहे.  प्रत्युत्तरात टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. आज भारताचा पहिला डाव 262 वर आटोपला. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली तर एजाज पटेलने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या होत्या. यानंतर भारताकडे 28 धावांची आघाडी होती. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकांत कर्णधार टॉम लॅथम बाद झाला. यानंतर डेव्हन कॉनवे आणि विल यंगने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंरतू कॉनवे सुंदरने 22 धावांवर बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेल्या रचिन रविंद्रला अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. डॅरेल मिचेल आणि विल यंगने चांगली भागिदारी केली. पंरतू डॅरेल मिचेलला (21) जाडेजाने बाद केले यांनतर फलंदाजीला आलेल्या टॉम ब्लूडंललाही (4) जाडेजाने स्वस्तात बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेला ग्लिन फिलीप्सने आक्रमक फलंदाजी केली. अश्विनने त्याला 26 धावांवर बाद केले. अश्विनने अर्धशतकविर विल यंगला देखील 51 धावांवर बाद करून भारताला 7 वे यश प्राप्त करून दिले तर जाडेजाने ईश सोढीला 8 धावांवर बाद करत भारताला 8 वे यश प्राप्त करून दिले.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 6519 05:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).