Ind vs Afg: भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सप्टेंबरमध्ये दिल्लीत रंगणार ३ सामन्यांची टी-२० मालिका

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयने भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेची अधिकृत घोषणा केली आहे. १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान हे सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील.

Photo Credit- X

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (ACB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनी आगामी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेची संयुक्त घोषणा केली आहे. या मालिकेत अफगाणिस्तान संघ भारताचे यजमानपद भूषवणार असून, हे सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ दरम्यान खेळवले जाणार आहेत.

मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

या मालिकेतील पहिला टी-२० सामना १३ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा सामना १५ सप्टेंबरला आणि तिसरा तसेच अंतिम सामना १७ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. तिन्ही सामने एकाच मैदानावर होणार असल्याने चाहत्यांना दिल्लीतच या सर्व लढतींचा आनंद घेता येणार आहे.

तटस्थ ठिकाण म्हणून भारताची निवड

ही मालिका अफगाणिस्तानच्या 'फ्युचर टूर्स प्रोग्राम' (FTP) अंतर्गत आयोजित केली जात आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे हा संघ गेल्या काही वर्षांपासून आपले गृहसामने (Home Matches) भारतातच खेळवत आला आहे. या मालिकेसाठीही त्यांनी दिल्लीतील स्टेडियमची निवड केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement