India Tour of South Africa 2021: भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 9 दिवसांनी स्थगित, 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटीसह होणार ‘शुभारंभ’
कोलकाता येथे BCCI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आता सुधारित तारखांसह सुरू होणार असून पहिला कसोटी सामना आता 26 डिसेंबर रोजी सुरू होईल. मूळ वेळापत्रकानुसार, तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी 9 दिवस आधी म्हणजे, 17 डिसेंबर रोजी खेळली जाणार होती.
BCCI ची 90 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोलकाता येथे पार पडली. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour of South Africa) 2021-22 सुधारित तारखा आणि कार्यक्रमासह जशास तास राहील असा निर्णय बैठकीत घेण्यात असून 26 डिसेंबरपासून दोन्ही संघात तीन कसोटी आणि वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)