India Beat Ireland: टी-20 विश्वचषकात भारताची विजयाने सुरुवात, आयर्लंडचा आठ गडी राखून केला पराभव
टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) आठव्या सामन्यात आज भारताचा सामना अ गटात आयर्लंडसोबत (IND vs IRE) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने आयर्लंडचा आठ गडी राखून पराभव केला आहे.
IND vs IRE: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) आठव्या सामन्यात आज भारताचा सामना अ गटात आयर्लंडसोबत (IND vs IRE) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने आयर्लंडचा आठ गडी राखून पराभव केला आहे. तत्तपुर्वा, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीसाठी आयर्लंडच्या संघांने भारतासमोर 97 धावांचे लक्ष्य ठेवले. आयर्लंडकडून डेलेनीने सर्वाधिक 26 धावा केल्या तर भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. दरम्यान लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 12.2 षटकातच दोन विकेट गमावून सामना जिंकला. ऋषभ पंतने 13व्या षटकात बॅरी मॅकार्थीच्या चेंडूवर षटकार मारून सामना संपवला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 52 धावा केल्या. मात्र, त्याला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य अद्याप समजू शकलेले नाही. आता भारतीय संघ अ गटात दोन गुणांसह अव्वल स्थानावर आला आहे. त्याचा पुढचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 9 जून रोजी होणार आहे.
WT20 2024. India Won by 8 Wicket(s) https://t.co/Yam05lIxPl #T20WorldCup #INDvIRE
— BCCI (@BCCI) June 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2024 10:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

