IND W vs SL W Asia Cup 2022: भारताने आपल्या मोहिमेला विजयाने केली सुरुवात, श्रीलंकेचा 41 धावांनी केला पराभव
तिने 143.40 च्या स्ट्राईक रेटने 53 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी सिलहट आऊटर क्रिकेट स्टेडियमवर आशिया कप 2022 टी-20 (Asia Cup 2022) स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा 41 धावांनी पराभव (IND vs SL) केला. श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात भारताने 20 षटकांत 6 बाद 150 धावा केल्या आणि त्यानंतर 18.2 षटकांत श्रीलंकेचा डाव 109 धावांत गुंडाळला. संघाकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 76 धावांची खेळी खेळली. तिने 143.40 च्या स्ट्राईक रेटने 53 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला. कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 चेंडूत 33 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांमध्ये 92 धावांची जबरदस्त भागीदारी झाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)