IND Beat BAN, ICC U19 World Cup 2024: अंडर-19 विश्वचषकात भारताची विजयाने सुरुवात, बांगलादेशचा 84 धावांनी केली पराभव
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या.
IND vs BAN ICC U19 World Cup 2024: आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 च्या तिसऱ्या सामन्यात, भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने विजयाची नोंद करून स्पर्धेची शानदार सुरुवात केली. ब्लोमफॉन्टेन येथील मॅनगॉंग ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा अंडर-19 संघ 45.5 षटकांत सर्वबाद 167 धावांत आटोपला. अशाप्रकारे बांगलादेशला पहिल्या सामन्यात भारताकडून 84 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. (हे देखील वाचा: Heinrich Klaasen ने SA20 मध्ये लगावला सर्वात लांब षटकार, पंचांना मागवावा लागला दुसरा चेंडू (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)