INDW vs BANW Live Score Update: भारताने बांगलादेशसमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले, जेमिमाचे शतक हुकले तर हरमननेही झळकावले अर्धशतक

प्रथम फलंदाजी करताना भारताने आठ विकेट गमावत 228 धावा केल्या. स्नेह राणा धावबाद झाल्याने भारताचा डाव संपला. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक 86 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतने 52 धावांची खेळी केली. स्मृती मंधानाने 36 आणि हरलीन देओलने 25 धावांचे योगदान दिले.

भारत आणि बांगलादेश (INDW vs BANW) महिला संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकून बांगलादेश संघाला प्रथमच भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकायची आहे. त्याचवेळी टीम इंडियाला गेल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर दमदार पुनरागमन करायचे आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने आठ विकेट गमावत 228 धावा केल्या. स्नेह राणा धावबाद झाल्याने भारताचा डाव संपला. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक 86 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतने 52 धावांची खेळी केली. स्मृती मंधानाने 36 आणि हरलीन देओलने 25 धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून सुलताना खातून आणि नाहिदा अख्तरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. राबिया खान आणि मुरफा अख्तर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now