IND-W vs SA-W T20 Tri-Series Live Score: भारताने दक्षिण आफ्रिकेला दिले 110 धावांचे लक्ष्य, हरलीन देओलने केल्या 46 धावा

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 109 धावा केल्या.

IND vs SA (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज T20 तिरंगी मालिकेचा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 109 धावा केल्या. टीम इंडियाकडून हरलीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 110 धावा करायच्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement