IND vs SA 2nd Test Live Score Update: चहापानापर्यंत भारताची धावसंख्या 111/4, पहिल्या डावात 56 धावांची आघाडी; कोहली-राहुल क्रीजवर
सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. दरम्यान, चहापानापर्यंत भारताने चार विकेट गमावून 111 धावा फळकावर लावल्या आहे तसेच पहिल्या डावात 56 धावाची आघाडी घेतली आहे.
IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. दरम्यान, चहापानापर्यंत भारताने चार विकेट गमावून 111 धावा फळकावर लावल्या आहे तसेच पहिल्या डावात 56 धावाची आघाडी घेतली आहे. विराट कोहली आणि केएल राहुल क्रिजवर नाबाद आहे. तत्तपुर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. पहिल्या सामन्यात सामान्य दिसणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.