India Lost World Cup Final: भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले; ट्रॅव्हिस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा बनला विश्वविजेता

ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक ठोकले तर लॅबुशेनने अर्धशतकीय पारी खेळली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकाची ट्रॉफी उचलली आहे.

भारताने दिलेल्या 241 धावांचे लक्ष्य 3 विकेटच्या मोबदल्यात सहज पार करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा क्रिकेटचे विश्वविजेतेपद जिंकले आहे. ऑस्ट्रेलियाचे तीन विकेट लवकर प्राप्त केल्यानंतर भारत हा सामना जिंकेल अशी आशा जिवंत झाली होती पंरतू ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी करोडो भारतीयांच्या आशेवर पाणी फेरले. ट्रॅव्हिस हेडने शानदार  शतक ठोकले तर लॅबुशेनने अर्धशतकीय पारी खेळली. ट्रॅव्हिस हेडने 121 चेंडूत 137  धावांची खेळी केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकाची ट्रॉफी उचलली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now