India Legends vs South Africa Legends: इंडिया लिजेंड्सने विजयाने केली सुरुवात, दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा 61 धावांनी केला पराभव
ग्रीन पार्क, कानपूर येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंडिया लिजेंड्सने 20 षटकात 217 धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला केवळ 156 धावा करता आल्या.
स्टुअर्ट बिन्नी (नाबाद 82), राहुल शर्मा (3 विकेट) यांच्या शानदार फलदांजी आणि गोलदांजीच्या बळावर शनिवारी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या सामन्यात इंडिया लिजेंड्सने दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा 61 धावांनी पराभव केला. रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत सरकारने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जगभरातील निवृत्त खेळाडू आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व करतात. ग्रीन पार्क, कानपूर येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंडिया लिजेंड्सने 20 षटकात 217 धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला केवळ 156 धावा करता आल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)