IND vs SL 3rd T20I Live Score Update: भारताला मिळाली पहिली मोठी विकेट, सलामीवीर निसांका 26 धावा करुन बाद

त्याचबरोबर चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ विजयासह मालिका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल.

Team India (Photo Credit - X)

IND vs SL 3rd T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज तिसरा टी-20 सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर चारिथ असालंकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ विजयासह मालिका संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करेल. तत्तपुर्वी, श्रीलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 137 धावा केल्या आहे. भारताकडून शुभमन गिलने 39 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर दुसरीकडे श्रीलंकेकडून महेश थेक्षानाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. आता श्रीलंकाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 138 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला पहिला धक्का लागला आहे. श्रींलकेचा स्कोर 61/1

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif