IND vs BAN T20 WC 2024 Super 8 Live Score Update: भारताला मिळाली सहावी विकेट, अर्शदीप सिंगने झाकीर अलीला केले बाद

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने 196 धावा फळकावर लावल्या आहे. भारतीय संघाकडून हार्दिक पांड्याने 50 सर्वाधिक धावा केल्या आहे. तर बांगलादेशकडून तनझिम हसन साकिब आणि रिशाद हुसेन प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Team India (Photo Credit - X)

IND vs BAN T20 WC 2024 Super 8: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील 47 वा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा सातवा सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. तर बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडू पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने 196 धावा फळकावर लावल्या आहे. भारतीय संघाकडून हार्दिक पांड्याने 50 सर्वाधिक धावा केल्या आहे. तर बांगलादेशकडून तनझिम हसन साकिब आणि रिशाद हुसेन प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 197 धावा करायच्या आहेत. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला सहावा धक्का लागला आहे. बांगलादेशचा स्कोर 110/6

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement