IND vs AFG 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील टी-20 मालिकेतील (T20I Series) तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. मालिकेच्या दृष्टीने या सामन्याला महत्त्व नाही. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली. मात्र, हा सामना जिंकून अफगाणिस्तानचा सफाया करण्याचा टीम इंडियाचा (Team India) प्रयत्न असेल. त्याचबरोबर अफगाण संघाला विजयासह मालिका संपवायची आहे. अफगाणिस्तान अजूनही कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 212 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने टी-20 मधले पाचवे शतक ठोकले तर रिंकूने 69 धावांची वादळी खेळी खेळली. अफगाणिस्ताला हा सामना जिंकण्यासाठी 213 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानला पहिला धक्का बसला आहे. अफगाणिस्तानचा स्कोर 128/3
2⃣ in 2⃣ for Washington Sundar 😎
First a Sanju Samson stumping followed by a Ravi Bishnoi catch!
Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwOHlL#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/0WA3rP1HjM
— BCCI (@BCCI) January 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)