India Beat Australia: भारताने पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून केला पराभव, रोमांचक सामन्यात रिंकू सिंगने लगावला विजयी षटकार

पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

India Beat Australia: भारताने पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून केला पराभव, रोमांचक सामन्यात रिंकू सिंगने लगावला विजयी षटकार

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. याआधी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 208 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी स्टार फलंदाज जोश इंग्लिसने शानदार फलंदाजी करत 110 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून रवी बिश्नोई आणि प्रसीध कृष्णाने प्रत्येकी एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 20 षटकांत आठ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 80 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघाने सर्वाधिक दोन बळी घेतले. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना रविवारी म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2023 10:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).