India Beat Pakistan: भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, आठ गडी राखून केला पराभव तर साई सुदर्शनने ठोकले धडाकेबाज शतक

भारताने पाकिस्तानवर मात करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. 21 जुलैला त्याचा सामना बांगलादेशशी होणार आहे.

Emerging Asia Cup 2023: इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेच्या ब गटात भारत अ ने पाकिस्तान अ संघावर (INDA vs PAKA) सलग तिसरा विजय नोंदवला. ग्रुप स्टेजमध्ये त्याने एकही सामना गमावला नाही. या विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तीन सामन्यांत त्याचे सहा गुण आहेत. त्याचवेळी पाकिस्तानला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचे आता तीन सामन्यांतून चार गुण झाले आहेत. नेपाळ ब गटात दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर यूएई संघाला एकही सामना जिंकता आला नाही. भारताने पाकिस्तानवर मात करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. 21 जुलैला त्याचा सामना बांगलादेशशी होणार आहे. (हे देखील वाचा: Asia Cup 2023 Schedule Out: वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडिया 'या' दिवशी भिडणार पाकिस्तानशी, आशिया कपचे वेळापत्रक जाहीर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now