India Beat New Zealand: लखनौमध्ये भारताने न्यूझीलंडवर 6 विकेट्सने केली मात, तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत

भारतीय संघाने पहिला टी-20 सामना 21 धावांनी गमावला, पण दुसरा सामना सहा विकेटने जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

Surya Kumar And Hardik Panda (Photo Credit - Twitter)

IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने पहिला टी-20 सामना 21 धावांनी गमावला, पण दुसरा सामना सहा विकेटने जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावा केल्या. भारताविरुद्ध टी-20 मध्‍ये किवी संघाची ही सर्वात कमी धावसंख्या होती. प्रत्युत्तरात टीम इंडियाने एक चेंडू बाकी असताना चार गडी गमावून लक्ष्य गाठले. सूर्यकुमार यादवने भारतीय डावातील 20व्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकला. या विजयासह तीन सामन्यांच्या T20I मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. निर्णायक सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now