India Beat England, World Cup 2023: भारताचा इंग्लंडवर 100 धावांनी मोठा विजय, टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये प्रवेश
या सामन्यातील विजयामुळे आता विश्वचषकातील 6 सामन्यातील 6 सामने भारताने जिंकून विश्वचषकातील सेमी फायनलमधला आपला प्रवेश पक्का केला आहे.
भारताने दिलेल्या 230 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लड संघाला जसप्रित बुमराहने सुरवातीलाच दोन धक्के दिले आहे. चांगल्या सुरुवातीनंतर डेव्हिड मलानला जसप्रित बुमराहने 16 धावांवर बाद केले त्यानंतर आलेल्या जो रुटला बुमराहने गोल्डन डकवर बाद केले. जसप्रित बुमराहने केलेल्या शानजार कामगिरीनंतर मोहम्मद शामीने दोन विकेट बाद केल्या. यानंतर जॉस बटलर आणि मोइन अलीने इंग्लंडचा डाव संभाळण्याचा प्रयत्न केला. कुलदिप यादवने जॉस बटलरला 10 धावांवर बाद केले त्यानंतर मोईन अलीला शमीने 15 धावांवर बाद केले. यानंतर लिविगस्टनला 27 धावांवर कुलदिपने बाद केले. अदिल रशिदला शमीने तर मार्क वुडला बुमराहने बाद केले. या सामन्यात शमीने 4 विकेट घेतल्या तर बुमराहने तीन. या सामन्यात 87 धावा करणारा रोहीत शर्मा सामन्याचा मानकरी ठरला.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)