IND vs ENG T20 WC 2024 Semi-Final 2: टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जिथे त्याचा सामना 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तत्तपुर्वी, इंग्लंडने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 171 धावा केल्या. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 57 धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्यानंतर इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटाकात 172 धावा करायच्या होत्या पण भारतीय फिरकीपटूसमोर गतविजेता संघ 103 धावावर गारद झाला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. आता 29 जून रोजी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)