IND-W vs WI-W, Women's World Cup: स्मृती मंधाना-दीप्ती शर्मा यांची चमकदार खेळी, भारताने दुसऱ्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा 81 धावांनी उडवला धुव्वा

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून विंडीज महिला संघाविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा यांनी दमदार अर्धशतके ठोकली. भारतीय महिलांचा डाव 258 धावांत आटोपला. यांनतर गोलंदाजांनी आक्रमक खेळ करून संघाला वर्ल्ड कपपूर्वी आश्वासक सुरुवात करून दिली.

भारत महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI)

ICC Women's World Cup 2022: भारतीय महिला संघाने (India Women's Cricket Team) मंगळवारी वेस्ट इंडिजच्या महिलांचा (West Indies Women) 81 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे भारताने वनडेत सलग तिसरा विजय नोंदवला. फलंदाजी विभाग क्लिनिकल होता आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी केली. पूजा वस्त्राकरने सर्वाधिक 3 बळी घेतले. तत्पूर्वी, टीम इंडियाने (Team India) नाणेफेक जिंकून विंडीज महिला संघाविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांनी दमदार अर्धशतके ठोकली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)