IND-W vs SL-W: मिताली राजच्या निवृत्तीनंतर हरमनप्रीत कौरची भारताच्या वनडे कर्णधारपदी नियुक्ती; श्रीलंका दौऱ्यासाठी वनडे, टी-20 संघ जाहीर

IND-W vs SL-W 2022: मिताली राजच्या जागी हरमनप्रीत कौरची भारतीय महिला संघाची नवी वनडे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने श्रीलंका मालिकेसाठी संघ जाहीर करत स्मृती मंधानाची उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय संघ 23 जूनपासून सुरु होणाऱ्या वनडे, टी-20 मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे.

हरमनप्रीत कौर (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर हरमनप्रीत कौरची (Harmanpreet Kaur) भारतीय महिला वनडे कर्णधार (India Women ODI Captain) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भारताच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी (Sri Lanka Tour) संघाची बुधवारी बैठक झाली. भारत 23 जूनपासून तीन टी-20 आणि डंबुला व कॅंडी येथे तितकेच एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement