IND-W vs NZ-W 1st ODI: मिताली राजच्या अर्धशतकानंतरही पहिल्या वनडेत भारताचा पराभव, न्यूझीलंड 62 धावांनी झाली विजयी
न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने क्वीन्सटाउन येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 62 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. व्हाईट फर्न्सने पहिले फलंदाजी करून सर्वबाद 275 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात कर्णधार मिताली राज हिने 59 धावांची अर्धशतकी खेळी करूनही भारताचा डाव 213 धावांत आटोपला. मालिकेतील दुसरा सामना 15 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.
न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने (India Women's Cricket Team) क्वीन्सटाउन (Queenstown) येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 62 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने (New Zealand) भारतासमोर विजयासाठी 276 धावांचे लक्ष्य ठेवले होते, भारतीय संघ 213 धावाच करू शकला. कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) सर्वाधिक 59 धावांची खेळी केली, तर यास्तिका भाटियाने 41 धावा केल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)