IND W vs NZ W 1st ODI 2024 Toss Update: टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग 11

हरमनप्रीत कौरला दुखापत झाली असून तिला पहिल्या वनडेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

IND W vs NZ W (Photo Credit - X)

Indian Women National Cricket Team vs New Zealand Women National Cricket Team 1st ODI 2024: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज, गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीत कौरला दुखापत झाली असून तिला पहिल्या वनडेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), लॉरेन डाउन, जेस केर, मॉली पेनफोल्ड, ईडन कार्सन

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, तेजल हसबनीस, राधा यादव, अरुंधती रेड्डी, सायमा ठाकोर, रेणुका ठाकूर सिंग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)