IND vs WI T20I 2022: भारताविरुद्ध असा आहे वेस्ट इंडिजचा टी-20 संघ, रोहितच्या ‘हिटमॅन’ आर्मीला देणार काट्याची टक्कर
वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी त्यांच्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध मायदेशात खेळलेल्या मालिकेतील अपरिवर्तित संघाचा कर्णधार म्हणून किरोन पोलार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिस गेलला बाहेर बसावे लागणार आहे, तर बिग हिटर निकोलस पूरन भारत दौऱ्यावर वेस्ट इंडिजच्या टी-20 संघाचा उपकर्णधार असेल.
IND vs WI T20I 2022: वेस्ट इंडिजने (West Indies) भारताविरुद्ध (India) 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी त्यांच्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध (England) मायदेशात खेळलेल्या मालिकेतील अपरिवर्तित संघाचा कर्णधार म्हणून किरोन पोलार्डची (Kieron Pollard) नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज 6 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये 3 वनडे आणि त्यानंतर कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर टी-20 मालिका खेळणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)