IND vs WI Series 2022: भारतीय संघ कोरोनाच्या विळख्यात, वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या पाचव्या खेळाडूला विषाणूची लागण

Axar Patel Test COVID Positive: वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. संघाचा स्टार फिरकी गोलंदाजी अष्टपैलू अक्षर पटेल देखील कोविड- पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. अक्षराची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची ही दुसरी वेळ आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांची T20I मालिका 16 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

अक्षर पटेल (Photo Credit: PTI)

भारतीय संघाचा (Indian Team) फिरकी गोलंदाज अष्टपैलू अक्षर पटेलची (Axar Patel) कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे. अनेक अहवालांनुसार, वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध वनडे आणि टी-20I मालिकेपूर्वी अक्षर हा व्हायरसचा संसर्ग झालेला भारतीय संघातील 5वा खेळाडू आहे. यापूर्वी बुधवारी शिखर धवन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी यांचे RT-PCR अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement