IND vs WI ODI 2022: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी किरोन पोलार्डचा वेस्ट इंडिजचा संघ अहमदाबादमध्ये दाखल, पहा Photos
IND vs WI ODI 2022: भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ अहमदाबाद येथे पोहोचला आहे. मूळ वेळापत्रकानुसार वेस्ट इंडिज अहमदाबाद, जयपूर आणि कोलकाता येथे तीन एकदिवसीय सामने खेळणार होते. तथापि, गेल्या महिन्यात देशभरात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे बीसीसीआयने अहमदाबाद येथे वनडे आणि कोलकाता येथे टी-20 मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
IND vs WI ODI 2022: भारताविरुद्ध (India) 6 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी किरोन पोलार्डचा वेस्ट इंडिज (West Indies) संघ अहमदाबाद येथे पोहोचला आहे. विंडीज क्रिकेटच्या अधिकृत हँडलने ट्विट केले आहे की, “बार्बडोसहून (Barbados) काही दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर #MenInMaroon भारतात दाखल झाले आहे.”
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)