IND vs WI 3rd T20I: सूर्यकुमार यादवचे दमदार अर्धशतक, Venkatesh Iyer याची तडाखेबाज फलंदाजी; वेस्ट इंडीजसमोर 185 धावांचे लक्ष्य

IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात यजमान टीम इंडियाने सूर्यकुमार यादवचे दमदार अर्धशतक आणि अष्टपैलू वेंकटेश अय्यर याच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर 185 धावांचे विशाल आव्हान दिले आहे. दोघांच्या अर्धशतकी भागीदारीने अडचणीतून संघाचा डाव सावरला. सूर्यकुमारने 65 धावा केल्या वर वेंकटेश नाबाद 35 धावा करून परतला. याशिवाय ईशान किशनने 34 धावांचे योगदान दिले.

सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तिसऱ्या टी-20 सामन्यात यजमान टीम इंडियाने (Team India) सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) दमदार अर्धशतक आणि अष्टपैलू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर 184 धावांचा डोंगर उभारला आहे. दोघांच्या अर्धशतकी भागीदारीने अडचणीतून संघाचा डाव सावरला. सूर्यकुमारने 65 धावा केल्या वर वेंकटेश नाबाद 35 धावा करून परतला. दुसरीकडे, विंडीजसाठी जेसन होल्डर (Jason Holder), रोमॅरियो शेफर्ड, हेडन वॉल्श जूनियर, रोस्टन चेस आणि डॉमिनिक ड्रेक यांनी प्रत्येकी एक गाडी बाद केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now