IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडे सामन्यात Virat Kohli शून्यावर गारद, वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडून नकोशा यादीत पटकावले दुसरे स्थान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा आणि शेवटच्या वनडे सामन्यात विंडीज वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीला सामन्याच्या चौथ्या षटकात खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये पाठवले. विराट वनडेत 15 व्या वेळी खाते न उघडताच बाद झाला आहे. वनडेमध्ये सर्वाधिक वेळा बाद झालेल्या भारतीय फलंदाजांच्या यादीत कोहली आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd ODI: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तिसरा व शेवटच्या वनडे सामन्यात विंडीज वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) सामन्याच्या चौथ्या षटकात खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये पाठवले. विराट वनडेत 15 व्या वेळी खाते न उघडताच बाद झाला आहे. तर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट झाल्यानंतर विराट आता या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या प्रकरणात त्याने माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement