IND vs WI 2nd T20I: ईडन गार्डन्सवर उतरताच किरोन पोलार्डने झळकावले ‘शतक’, आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये ‘हा’ कारनामा करणारा बनला पहिला वेस्ट इंडियन

कोलकाता येथे दुसरा टी-20 सामना पोलार्डच्या कारकिर्दीतील 100 वा आंतरराष्ट्रीय ठरला आहे. 34 वर्षीय पोलार्ड 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा जगातील 9 वा आणि विंडीजचा पहिला खेळाडू ठरला आहे. या खास क्षणाची नोंद घेत निकोलस पूरन आणि जेसन होल्डर यांनी पोलार्डला 100 वी जर्सी व कॅप देऊन सन्मानित केले.

वेस्ट इंडिज कर्णधार कीरोन पोलार्ड (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs WI 2nd T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) दुसरा T20 सामना किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याच्यासाठी खास बनला आहे. कोलकाता (Kolkata) येथे दुसरा टी-20 सामना पोलार्डच्या कारकिर्दीतील 100 वा आंतरराष्ट्रीय ठरला आहे. 34 वर्षीय पोलार्ड 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा जगातील 9 वा आणि विंडीजचा पहिला खेळाडू ठरला आहे. पोलार्डने आतापर्यंत 99 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 135 च्या स्ट्राइक रेटने 1561 धावा केल्या आहेत आणि 42 बळी घेतले आहेत.