IND vs WI 2022 Series: भारत दौऱ्यावर वेस्ट इंडिजशी टीम इंडिया करणार दोन हात, असे आहे मर्यादित षटकांचे संपूर्ण Schedule

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरेल. तीन वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका आता फक्त दोन ठिकाणी प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळली जाईल. भारतचे विंडीजविरुद्ध मर्यादित षटकांचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

रिषभ पंत, शिमरोन हेटमेयर (Photo Credits: IANS)

IND vs WI 2022 Series: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीपचा सामना केलेली टीम इंडिया (Team India) आता मायदेशात वेस्ट इंडिजशी (West Indies) दोन हात करणार आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरेल. संघाचा नवा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीनंतर संघात पुनरागमन करेल. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे रोहितला संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर बसावे लागले होते. त्याच्या जागी Proteas विरुद्ध वनडे मालिकेत प्रभारी कर्णधार केएल राहुलने नेतृत्व केले होते, पण आता रोहित परतल्यावर तो पुन्हा संघाची कमान आपल्या हाती घेईल. याशिवाय भरतील कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे मालिकेच्या स्थळांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तीन वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका आता फक्त दोन ठिकाणी प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळली जाईल. भारतचे विंडीजविरुद्ध मर्यादित षटकांचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. (IND vs WI 2022 Match Venue: बीसीसीआयकडून वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी सुधारित ठिकाणांची घोषणा, आता अहमदाबाद आणि कोलकातामध्ये खेळवणार सामने)

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका वेळापत्रक

6 फेब्रुवारी - पहिली वनडे, अहमदाबाद

9 फेब्रुवारी - दुसरी वनडे, अहमदाबाद

11 फेब्रुवारी - तिसरी वनडे, अहमदाबाद

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 मालिका वेळापत्रक

16 फेब्रुवारी - पहिली टी-20, कोलकाता

18 फेब्रुवारी - दुसरी टी-20, कोलकाता

20 फेब्रुवारी - तिसरा टी-20, कोलकाता

दरम्यान, कॅरेबियन संघ 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबादला पोहोचेल आणि त्यानंतर तीन दिवस त्यांना आयसोलेशनमध्ये रहावे लागेल. बीसीसीआयने तिसऱ्या वनडेच्या तारखेत बदल केला आहे. 12 फेब्रुवारी रोजी होणारा सामना आता 11 फेब्रुवारीला खेळला जाईल. इंडियन प्रीमियर लीगचा लिलाव 12 फेब्रुवारीपासून होणार आहे आणि बोर्डाला लिलावात सामन्याचा अडथळा नको आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)