IND vs SL T20I 2022: दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेतून बाहेर, BCCI कडून बदली खेळाडूंची घोषणा नाही

भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांना श्रीलंकेविरुद्ध आगामी टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. विराट कोहली, ऋषभ पंत यांना मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून सूर्यकुमारच्या अनुपस्थितीमुळे रुतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांना पराक्रम दाखवण्याची संधी मिळे. तर चाहर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे.

दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: Twitter/BCCI)

भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) आणि फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) आगामी टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. रविवारी कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षणाच्या प्रयत्नात सूर्यकुमारला सूर्यकुमारला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले तर गोलंदाजीदरम्यान दीपकला उजव्या बाजूच्या क्वाड्रिसेप्सला दुखापत झाली. आता ते त्यांच्या दुखापतींच्या पुढील व्यवस्थापनासाठी बेंगळुरू येथील NCA मध्ये जातील.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement