IND vs SL Series 2022: भारताविरुद्ध T20 मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा, वनिंदू हसरंगाचे पुनरागमन; जाणून घ्या कोणाला मिळाली संधी
IND vs SL T20I 2022: 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आगामी 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत मजबूत फिरकी गोलंदाजांचा समावेश असलेल्या 18 सदस्यीय श्रीलंका संघाचे नेतृत्व दसुन शनाका करेल. तर चरित असलंका उपकर्णधार आहे. याशिवाय कुसल मेंडिस, पथुम निसांका, दिनेश चंडिमल आणि दानुष्का गुनाथिलका यांचा देखील संघात समावेश आहे.
IND vs SL T20I 2022: भारत दौऱ्यावर (India Tour) 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान खेळल्या जाणार्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेने (Sri Lanka) सोमवारी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. दासून शनका (Dasun Shanaka) संघाचे नेतृत्व करत राहील, तर दुखापतग्रस्त अविष्का फर्नांडो, नुवान तुषारा, आणि रमेश मेंडिस यांना आराम देण्यात आला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कोविड-19 पॉझिटिव्ह आढळलेला वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) देखील संघात परतला आहे.
Sri Lanka T20I squad for India tour 2022 - https://t.co/SofZ6k22gC
⬇️#INDvSL pic.twitter.com/Pfj3TTehOg
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2022 08:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

