IND vs SL 2nd ODI 2021: चुरशीच्या सामन्यात जबरा फलंदाजीनंतर Deepak Chahar मैदानात ‘हे’ काम करताना दिसला, पाहा Photo
टीम इंडियाच्या विजयाचा अन्य खेळाडू मैदानात उतरून आनंद घेत असताना संघाच्या विजयात जबरा फलंदाजी करणारा दीपक चाहर मात्र मैदानावर वेगळेच काम करताना दिसला.
IND vs SL 2nd ODI 2021: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने (India) श्रीलंकेवर (Sri Lanka) 3 गडी राखून विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या (Team India) विजयाचा अन्य खेळाडू मैदानात उतरून आनंद घेत असताना संघाच्या विजयात जबरा फलंदाजी करणारा दीपक चाहर (Deepak Chahar) मात्र मैदानावर वेगळेच काम करताना दिसला. दीपकने झुंजार अर्धशतकी खेळी करत भुवनेश्वर कुमारसोबत 84 धावांची अभेद्य भागीदारी रचली. दोघांच्या चिवट फलंदाजीमुळे लंकेच्या तोंडचा विजयाचा घास हिरावला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)