IND vs SA 3rd ODI: केपटाऊन वनडेत Rassie van der Dussen चे खणखणीत अर्धशतक, भारतीय गोलंदाजांचा घेतला समाचार; पहा स्कोर
IND vs SA 3rd ODI: भारताविरुद्ध आपला शानदार फॉर्म कायम ठेवून दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज रसी व्हॅन डर डुसेनने केपच्या न्यूलँड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 53 चेंडूत खणखणीत अर्धशतक झळकावले आहे. डुसेनच्या वनडे कारकिर्दीतील हे 10 वे अर्धशतक ठरले आहे. यादरम्यान डुसेनने सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या साथीने शतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या दोनशे पार नेली.
IND vs SA 3rd ODI: भारताविरुद्ध (India) आपला शानदार फॉर्म कायम ठेवून दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) तडाखेबाज फलंदाज रसी व्हॅन डर डुसेनने (Rassie van der Dussen) केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 53 चेंडूत खणखणीत अर्धशतक झळकावले आहे. डुसेनच्या वनडे कारकिर्दीतील हे 10 वे अर्धशतक ठरले आहे. यादरम्यान व्हॅन डर डुसेनने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत त्यांच्यावर हल्ला चढवला आणि सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) साथीने शतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या दोनशे पार नेली. 35 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 212/3 आहे.
Fifty for Rassie van der Dussen! 👌
The South African is yet to be dismissed this series 👀
Watch the series live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#SAvIND | https://t.co/u8dAzkQuxt pic.twitter.com/CmZjMCoagq
— ICC (@ICC) January 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2022 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

