IND vs SA 2nd ODI 2022: टीम इंडियाला पहिला धक्का, शिखर धवन फक्त 29 धावा करून तंबूत परत

मार्करमच्या फिरकीवर भारतीय सलामीवीर शिखर धवन मोठा फटका खेळण्याचा मोह आवरू शकला नाही आणि बाउंड्री लाईनवर सिसंदा मगालाकडे झेलबाद झाला.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd ODI 2022: दक्षिण आफ्रिकेचा पार्ट-टाइम फिरकीपटू एडन मार्करमने पार्लच्या बोलंड पार्क येथील दुसऱ्या वनडे सामन्यात फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला पहिला दणका दिला आहे. मार्करमच्या फिरकीवर भारतीय सलामीवीर शिखर धवन मोठा फटका खेळण्याचा मोह आवरू शकला नाही आणि बाउंड्री लाईनवर सिसंदा मगालाकडे झेलबाद झाला. यासह धवन आणि केएल राहुल यांच्यातील 63 धावांची भागीदारी तुटली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)