IND vs SA 2022: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी सूर्यकुमार यादवने बेंगलोरमध्ये घेतली रोहित शर्माची भेट, पाहा Photo
टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने नुकतीच बेंगलोरमध्ये कर्णधार रोहित शर्माची भेट घेतली. सूर्यकुमार दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रोहितला हॅमस्ट्रिंगच्या लवकरच रवाना होणार आहे तर हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे रोहितला मालिकेतून बाहेर बसावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडू सध्या एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.
IND vs SA 2022: भारतीय एकदिवसीय संघाचे सदस्य 50 षटकांच्या तीन सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे घाम गाळत आहेत. शिखर धवन, युजवेंद्र चहल आणि इतर काही जणांनी NCA मधील प्रशिक्षणदरम्यान फोटो शेअर केली आहेत आणि आता सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) त्यांचे अनुकरण केले आहे.
Hey b-Ro💙🤗 pic.twitter.com/i5p6WTn0mO
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) January 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2022 07:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

