IND vs SA 1st Test Day 3: भारताचा वेगवान गोलंदाज Mohammad Siraj ने विकेट घेतल्यावर केले क्रिस्टियानो रोनाल्डो स्टाईल सेलिब्रेशन! (Watch Video)

भारतीय गोलंदाजी दरम्यान मोहम्मद सिराजने आफ्रिकी संघाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज रस्सी व्हॅन डर डुसेन याला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. डुसेनची विकेट घेतल्यानंतर सिराजने पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले.

मोहम्मद सिराजचे रोनाल्डो-स्टाईल सेलिब्रेशन (Photo Credit: Twitter)

IND vs SA 1st Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया (Team India) मजबूत स्थितीत दिसत आहे. भारतीय गोलंदाजी दरम्यान मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) पूर्ण रंगात दिसला आणि त्याने आफ्रिकन संघातील सर्वात विश्वासार्ह फलंदाज रस्सी व्हॅन डर डुसेन याला स्वस्तात तंबूत धाडलं. डुसेनची विकेट घेतल्यानंतर सिराजने दिग्गज फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)