IND vs SA 1st ODI 2022: पहिल्या वनडेसाठी Wasim Jaffer ने भारतीय XI चा वर्तवला अंदाज, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दोन सरप्राईज खेळाडूंची केली निवड
भारताचा माजी कर्णधार वसीम जाफरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार्ल येथील बोलंड पार्क येथे 19 जानेवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा अंदाज वर्तवला आहे. जाफरने श्रेयस अय्यरसोबत मधल्या फळीमध्ये यष्टीमागे रिषभ पंत याना प्राधान्य दिले तर बुधवारच्या सामन्यासाठी वेंकटेश अय्यर आणि ईशान किशन यांना बाकावर बसवले.
IND vs SA 1st ODI 2022: भारताचा माजी कर्णधार वसीम जाफरने (Wasim Jaffer) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पार्ल येथील बोलंड पार्क येथे 19 जानेवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा अंदाज (India Playing XI Prediction) वर्तवला आहे. जाफरने शिखर धवन आणि रुतुराज गायकवाड सलामीसाठी निवडले. तर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांचाही समावेश केला. तर व्यंकटेश अय्यर आणि ईशान किशन यांना त्यांच्या संभावित इलेव्हनमधून बाहेर केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)