IND vs PAK Women's World Cup 2022: विश्वचषकच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा संघर्ष, धुरंधर फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांपुढे टेकले गुडघे

IND vs PAK Women's World Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्यात महिला विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना बे ओव्हल येथे खेळला जात आहे. स्मृती मंधानाच्या अर्धशतकी खेळीनंतर एका क्षणी भारताची धावसंख्या 1 गडी गमावून 96 धावा होती, पण दीप्ती शर्मा बाद होताच टीम इंडियाचा फलंदाजी क्रम पत्त्यासारखा विखुरला. आणि भारताने 34 षटकांत 115 धावांत 6 विकेट गमावल्या आहेत.

शेफाली वर्मा व स्मृती मंधाना (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs PAK Women's World Cup: भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात महिला विश्वचषक (Women's World Cup) स्पर्धेचा पहिला सामना बे ओव्हल येथे खेळला जात आहे. स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) अर्धशतकी खेळीनंतर एका क्षणी भारताची धावसंख्या 1 गडी गमावून 96 धावा होती, पण दीप्ती शर्मा बाद होताच टीम इंडियाचा (Team India) फलंदाजी क्रम  पत्त्यासारखा विखुरला. आणि भारताने 34 षटकांत 115 धावांत 6 विकेट गमावल्या आहेत. कर्णधार मिताली राज, उपकर्णधार हरमनप्रीत कौर, धडाकेबाज सलमी फलंदाज शेफाली वर्मा यांच्यासारख्या धुरंधर खेळाडूंनी पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे गुडघे टेकले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement