IND vs NZ WTC Final 2021: पावसामुळे भारत-न्यूझीलंड महामुकाबल्याचे पहिले सत्र रद्द, नेटकऱ्यांचे हे भन्नाट Memes तुमचा मूड उंचावतील

नेटकऱ्यांनी महामुकाबल्याला विलंब झाल्यामुळे अनेक मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल केले जे तुमचा मूड उंचावण्यात मदत करतील.

साउथॅम्प्टनमध्ये पावसाचा व्यत्यय (Photo Credit: Twitter/BCCI)

साऊथॅम्प्टन (Southampton) येथे पावसाची संततधार सुरु असल्यामुळे भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्याच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आले. इतकंच नाही तर येत्या पाच दिवस साऊथॅम्प्टनमध्ये खराब हवामान होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. पावसाचा हंगाम असताना आयसीसीला इतका महत्त्वाचा सामना साऊथम्प्टनमध्ये घेण्याची गरज काय होती? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नेटकऱ्यांनी दोन्ही संघातील महामुकाबल्याला विलंब झाल्यामुळे अनेक मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल केले जे तुमचा मूड उंचावण्यात मदत करतील.

साऊथॅम्प्टन कडून थेट

कार्यक्रमात थोडा बदल आहे...

WTC आयोजक

कोहली आणि विल्यमसन

आत्ता # WTC2021 खेळण्याचा एकमेव मार्ग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)